#KXIPvCSK : किंग्ज इलेव्हन पंजाबचा चेन्नईवर 6 विकेटसने विजय

मोहाली – सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज 71 धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईवर सुपर किंग्जवर 6 विकेटसने विजय मिळविला आहे. या विजयासह किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएलमध्ये 12 गुण झाले आहेत. के. एल. राहुल सामनावीर ठरला.

तत्तूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाबने 18 षटकांत 4 बाद 173 धावा करत विजय संपादित केला.

आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीपासूनच चांगली फलंदाजी करत शेवटपर्यंत सामन्यावर वर्चस्व कायम राखले. सलामीवीर लोकेश राहुलने 36 चेंडूत 71 धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी निभावली. तर निकोलस पुरनने 36 आणि क्रिस गेलने 28 धावा करत विजयाचा मार्ग सुकर केला. मंदीप सिंहने नाबाद 11 आणि सैम करणने नाबाद 6 धावा करत संघास विजय मिळवून दिला. चेन्नईकडून गोलंदाजीत हरभजन सिंहने 4 षटकांत 57 धावा देत सर्वाधिक 3 विकेटस घेतल्या.

चेन्नईकडून फाफ डू प्लेसीने 55 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारासह सर्वाधिक 96 धावा केल्या. तर सुरेश रैनाने 38 चेंडूत 53 धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून गोलंदाजीत सैम करणने 4 षटकांत 35 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.