नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय

मोहाली – बाराव्या सत्रातील आयपीएलचे साखळी सामने अंतिम टप्प्यात असून प्ले ऑफमधील चौथा संघ अद्याप निश्‍चित होण्याचे बाकी आहे. याच वेळी सुपर संडेला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या निश्‍चयाने खेळणार आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्तूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीच पाचारण केले आहे.

चेन्नई सुपर किंग्स

फाफ डू प्लेसी, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, अंबाति रायुडू, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर

किंग्ज इलेव्हन पंजाब

क्रिस गेल, लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, निकोलस पुरन, मंदीप सिंह, सैम करण, रविचंद्रन अश्विन, एंड्रयू टाई, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, हरप्रीत बरार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.