#IPL : आव्हान कायम राखण्यास पंजाबला आज राजस्थानविरूध्द विजय आवश्‍यक

राजस्थान राॅयल्स विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब

वेळ – रात्री 8 वाजता;

स्थळ – मोहाली क्रिकेट मैदान

मोहाली – आयपीएलच्या बाराव्या मोसमात पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी केल्यानंतर गेल्या काही सामन्यांमध्ये कामगिरीतील सातत्य राखता न आल्याने क्रमवारीत पाचव्यास्थानी घसरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर नुकताच विजयी मार्गावर परतलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे.

यंदाच्या मोसमाता पंजाबने 8 सामन्यांमधील चार सामन्यात विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून सध्या त्यांचे आठ गुण झालेले आहेत. त्यामुळे ते पाचव्या क्रमांकावर आहेत. तर, राजस्थान रॉयल्सचा संघ सात सामन्यांमध्ये 2 विजय आणि पाच पराभव पत्करल्याने सातव्यास्थानी पोहोचला असून राजस्थानच्या संघाचे केवळ चारच गुण झालेले आहेत. यावेळी राजस्थानच्या संघाने बंगळुरू आणि मुंबईच्या संघा विरुद्धचा सामना जिंकत स्पर्धेत विजय मिळवला असून मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यांनी आपल्या संमिश्र कामगिरीतून विजयी मार्गावर पुनरागमन केले आहे.

यावेळी पंजाबचा संघ स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करत आहे. मात्र, त्यांच्या संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे. त्यातच संघातील मधल्या फळीतील खेळाडू विशेष कामगिरी करु शकले नसल्याने पंजाबचा संघ ऐनवेळी पिछाडीवर पडताना दिसून येतो आहे. त्यातच संघातील डेव्हिड मिलर, सॅम करन आणि मयंक अग्रवालयांनी पहिल्या काही सामन्यात प्रभावीत केल्यानंतर नंतर त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच त्यांच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी वगळता इतर गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता न आल्याने त्यांना त्याचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

तर, दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाने पहिल्या सामन्यापासून प्रभावीत केले असले तरी त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश येत होते. मात्र, मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि सलामीवीर जोस बटलरने प्रभावी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी राजस्थानच्या दृष्टीने सर्वात चांगली बाब म्हणजे सलामीवीर जोस बटलरचे फॉर्ममध्ये येणे असून आजच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्चांचीनजर असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयचीत, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, ऍश्‍टॉन टर्नर.

Leave A Reply

Your email address will not be published.