#IPL2019 : चेन्नई-पंजाब आज पुन्हा आमने-सामने

किंग्ज इलेव्हन पंजाब Vs चेन्नई सुपर किंग्ज

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – बिंद्रा स्टेडियम, मोहाली

मोहाली – बाराव्या सत्रातील आयपीएलचे साखळी सामने अंतिम टप्प्यात असून प्ले ऑफमधील चौथा संघ अद्याप निश्‍चित होण्याचे बाकी आहे. याच वेळी सुपर संडेला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या निश्‍चयाने खेळणार आहेत.

यंदाच्या सत्रात पंजाबने दिमाखात प्रारंभ केला होता. मात्र, गत 7 सामन्यात संघाचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. या 7 सामन्यात पैकी फक्‍त 1 सामन्यात पंजाबला विजय मिळविता आला. पण अखेरच्या सामन्यात ते विजय मिळविण्यासाठी आतूर आहेत. चेन्नईविरुद्ध संतुलित खेळी करत पंजाब विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात मनदीप सिंहच्या जागी करुण नायरला संधी देण्याची शक्‍यता आहे.

दुसरीकडे गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ अखेरच्या सामन्यातही विजयी लय राखण्यासाठी मैदानात उतरेल. साखळी सामन्यात चेन्नईने आतापर्यत चांगले प्रदर्शन केले असल्याने ते संघात बदल होण्याची शक्‍यता कमी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.