मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. पठाणच्या यशावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आनंद व्यक्त करत आहेत. अश्यातच आता शाहरुखच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. ‘जवान’ चित्रपटाची कथा 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पररासू’ या चित्रपटासारखी असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक एटली दिग्दर्शित करत आहेत. एटलीही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून पुढील वर्षी जूनपर्यंत तो प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक शाहरुखच्या डंकी आणि जवान या दोन आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर पट्टी दिसत आहे. हा फोटो एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जवानच्या सेटवरील शाहरुखचा मॉनस्टर अवतार…’. सध्या हा फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांना किंग खानचा हा लूक प्रचंड आवडल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमीळ, हिंदी, तेलूगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.