कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणू आता आपले पाय पसरू लागला आहे. काही दिवसांपुर्वी कोरोनाबाबत चिंतामुक्त असलेल्या भारतीयांची चिंता आता वाढली आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक 31 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातही सर्व ठिकाणी सतर्कता घेण्यात येत आहे.
दख्यनचा राजा जोतिबा मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.