मुंबई – अमेरिकन सुपरस्टार किम कार्दशियन तिच्या हॉट लुकमुळे आणि रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. किमने प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसोबत घटस्फोट घेतल्याची बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा किम चर्चेत आली आहे आणि यावेळी देखील तिचे नाते चर्चेत येण्याचे कारण आहे. कान्ये वेस्टपासून विभक्त झाल्यानंतर, अभिनेत्री किम कॉमेडियन आणि अभिनेता पीट डेव्हिडसनला डेट करत होती, परंतु आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध अभिनेते पीट डेव्हिडसन आणि किम कार्दशियन यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघेही जवळपास 9 महिने एकमेकांना डेट करत होते. परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार किम आणि पीट या आठवड्यात वेगळे झाले आहेत.
याबाबत दोन्ही स्टार्सकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. एकीकडे कार्दशियनच्या मॅनेजरने या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे, तर पीट डेव्हिडसनच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
किम आणि पीटचे नाते गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झाले. दोघेही एकमेकांना खूप आवडायचे. त्यावेळी किम ‘SLN’ होस्ट करत होती, तर पीट या कॉमेडी स्केच शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता.
किम आणि रॅपर कान्ये वेस्टचा घटस्फोटाचा खटला अजूनही कोर्टात सुरू आहे. कान्येपासून वेगळे झाल्यानंतर तिला 28 वर्षीय पीट डेव्हिडसनसोबत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले गेले. या नात्यात किम खूप खूश असल्याचे तिने अनेकद स्वतः सांगितले.
किम कार्दशियनने आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. किमने पहिले लग्न 2000 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी डेमन थॉमससोबत केले होते. त्यानंतर चार वर्षांनी 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर किमने 2011 मध्ये क्रिस हमपेरिसशी लग्न केले आणि 2013 मध्ये त्याच्यापासून वेगळी झाली.