सेउल- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याची सख्खी बहीण किम यो जोंग हीसुद्धा त्याच्या इतकीच क्रूर असून गेल्या तीन दिवसात तिने दुसऱ्यांदा दक्षिण कोरियाला धमकी दिली असून हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.
किम जोंग यांची धाकटी बहीण असणारी यो ही आपल्या भावाच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभी असते. त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असणारी यो ही आपल्या भावा इतकीच क्रूर आणि खतरनाक मानली जाते. उत्तर कोरियाचा स्टेट अफेयर्स कमिशन या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुख पदी काम करणारी यो हिच्या हातात उत्तर कोरियाची सर्व संरक्षण विषयक आणि सुरक्षाविषयक सूत्रे आहेत.
या सर्व संस्थांचा आणि यंत्रणांचा वापर करून आपल्या देशांतर्गत विरोधकांनाही गप्प करण्याचे काम ती करते. गेल्या कालावधीमध्ये सरकार विरोधी बोलणाऱ्या काही अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा हुकूमही तिने दिला होता. 2014मध्ये किम जोंग अचानक सार्वजनिक जीवनामध्ये गायब झाल्यानंतर यो हिनेच या कालावधीमध्ये देशाचा सर्व कारभार सांभाळला होता.
आपल्या भावाची प्रतिमा सुधारण्यासाठी तिने अनेक निर्णय घेतले होते आणि मोहिमाही राबवल्या होत्या. किम जोंग जेव्हा आजारी असतात किंवा कारभार बघण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात तेव्हा देशाचा सर्व कारभार यो ही त्यांची बहीणच बघते. त्यामुळे देशाचा आगामी नेता म्हणून याच महिलेकडे पाहिले जात आहे.
कोरियाचा पारंपरिक शत्रू दक्षिण कोरियाला नामशेष करण्याची धमकी देत गेल्या काही दिवसांमध्ये देऊन किम यो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.