श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घ्यालण्यात यश आले आहे.
दुसरीकडे शोपिया येथे सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.
अबु रिहान आणि अदिल रशिद भट असे ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा येथे काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली.
सुरक्षा दलाच्या जवानांची शोध मोहिम सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला.
दहशतवादी पळून जावू नये म्हणून रात्रभर जवानांनी या परिसरात घेराव घालून ठेवला होता. त्यानंतर सकाळी दोन्ही लष्कर-ए-तोयबाच्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले.घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.