भंडाऱ्यात जीप नदीत कोसळून सहा ठार

भंडारा – भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्‍यातील धर्मापुरी गावालगत पुलावरून जीप कोसळून भीषण अपघात झाला आहे. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रित सुटल्याने ते 80 फूट खाली नदीत कोसळले. या दुर्घटनेत पाच मुलींसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात सहा प्रवासी गंभीर आहेत. यातील 3 महिलांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींना साकोली येथील सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.

सदर वाहन साकोलीवरुन लाखांदूरला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आले होते. त्यामुळे जीप पुलावर अनियंत्रित होऊन खाली पडली असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.