Sambaji bhide on Ashok kharat case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणार रोज नवनवे खुलासे होत आहे. खरातने अनेक पिडीत महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याची त्याचबरोबर अनेक धमकावून जमीनी मालमत्ता घेतल्या असल्याचं, त्याचबरोबर फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. अनेक नेत्यांचे आणि बड्या अधिकाऱ्यांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबत कनेक्शन असल्याचे समोर येताच राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या भोंदू खरातवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली. “अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये”, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भिडे गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी संभाजी भिडेंच्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. संभाजी भिडे यांनी आज पुण्यात श्रीराम नवमीनिमित्त हजेरी लावली होती, त्यावेळी ते बोलत होते. Sambaji bhide on Ashok kharat case Sambaji bhide on Ashok kharat case : “त्याला मारून टाकून मोकळं व्हावं…”; अशोक खरात प्रकरणावर संभाजी भिडेंची प्रतिक्रिया संभाजी भिडे म्हणाले, ‘आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस आपण रामनवमी मानला पाहिजे. यावेळी त्यांनी राम स्तोत्र म्हटलं. हे सगळं ठीक आहे. राम तत्वाला हरताळ फासणाऱ्या लोकांचा निर्णय बंदोबस्त करण्याची प्रकृती माणसात आणि समाजात असली पाहिजे. ‘प्राणीमात्रात राम आहे. असा सिद्धांत मांडून सापाला सोडता कामा नये. सापाला चेचला पाहिजे. राम प्रत्येक प्राण्यात असला पाहिजे. हा हिशोब हिंदुस्तान चुकला तर हिंदुस्तानी स्वातंत्र्य गमावलं ते गमू नये, असं वाटत असेल तर. कडव्या वृत्तीचा हिंदू समाज होणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले. खरातची कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची सध्या अशोक खरातची नवनवीन प्रकरण समोर येत असल्याने सामान्य लोकांमधून देखील अशोक खरातला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) खरातच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. Sambaji bhide on Ashok kharat case हेही वाचा: Iran Opens Hormuz For India: मोठी बातमी ! ‘भारतासारखे मित्र…’ म्हणत इराणकडून भारताला दिलासा ; तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी केली खुली