कीकूला तब्बल 78 हजारांना पडली एक चहा

अभिनेता राहुल बोस याला काही दिवासांपूर्वी अवघ्या 2 केळ्यांसाठी 442 रुपये मोजवे लागले होते. त्यानंतर आता असेच काहीसे टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन कीकू शारदा सोबतही घडले आहे. एक कप चहा आणि एक कॅपचीनो कॉफीसाठी कीकूला तब्बल 78,650 रुपये मोजावे लागले. कीकूने या बिलाचा फोटो त्याच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला. त्याच्या या ट्विटची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

या बिलाचा फोटो कीकूने सोशल मीडियावर शेअर केला आणि याविषयीची पूर्ण माहिती सुद्धा शेअर केली आहे. कीकूने लिहिले, एका कॅपचीनोसाठी मला हजारोंचे बिल भरावे लागले, पण त्याची मी तक्रार करत नाही आहे. कीकूला भराव्या लागलेल्या बिलानुसार एक गरम चहासाठी 30000 आणि एका कॅपचीनोसाठी 35000 आणि सर्व्हिस चार्ज 13650 रुपये वसूल करण्यात आले.

कीकूने या सर्व प्रकारानंतर याविषयी तक्रार न करण्याबद्दल लिहून काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोससोबत घडलेल्या प्रकरणाचीही आठवण करुन दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×