#IPL2019 : कायरन पोलार्डचे 25 टक्‍के मानधन कापले

हैदराबाद – मुंबई आणि चेन्नई दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव करत चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. या सामन्या दरम्यान पंचांनी दिलेला निर्णय न पटल्यामुळे नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवणाऱ्या पोलार्डवर कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी पोलार्डच्या मानधनातली 25 टक्के रक्कम कापून घेतली आहे.

पोलार्डकडून आयसीसीच्या लेव्हल वनच्या 1.2.8 नियमाचे उल्लंघन झाल्याचे सामनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित आणि डी-कॉक माघारी परतल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. मधल्या फळीत कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी संघाचा डाव सावरला.

ड्‌वेन ब्राव्होच्या अखेरच्या षटकात, टाकलेला वाईड बॉल पंच नितीन मेनन यांनी वैध ठरवला. यामुळे नाराज झालेल्या पोलार्डने पुढचा चेंडू वाईड लाईनच्या समोर जाऊन खेळत ब्राव्होचा सूर बिघडवला. यानंतर दुसरे पंच इयान गुल्ड आणि नितीन मेनन यांनी पोलार्डशी चर्चा करत त्याला खेळ सुरु ठेवण्याची समज दिली. त्याचे हे वागणे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत त्याचे 25 टक्‍के मानधन कापले गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)