पतीच्या पहिल्या पत्नीला केले किडनी दान; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या पत्नीचा निर्णय

फ्लोरिडा – अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना घडली आहे. आपल्या पतीच्या पहिल्या पत्नीला किडनी दान करून तिचा जीव वाचवण्याचे काम पतीच्या दुसऱ्या पत्नीने केले आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या पत्नीने हा निर्णय घेउन कौतुक मिळवले आता मी आणि माझ्या पती ची पहिली पत्नी किडनी सिस्टर्स आहोत अशी आता दुसरी पत्नी म्हणत आहे. 

किडनी दान करणाऱ्या या महिलेचे नाव डेबी विनील असे असून तिचा पती जिम आणि त्याची पहिली पत्नी मायलन यांनी वीस वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला होता. जिमने दुसरे लग्न डेबी हिच्याशी केले होते. गेल्या दहा वर्षांपासून पहिल्या पत्नी मायलनला किडनीचा विकार होता.

किडनी फक्त आठ टक्के काम करत होती अशा वेळी कोणीतरी किडनीदान केल्यानंतरच तिचा जीव वाचणार होता. जीमने अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही मायलनच्या किडणीला मॅच होईल अशा प्रकारे मेडिकल कंडीशन ची किडनी त्याला मिळाली नाही.

पण जिमची दुसरी पत्नी डेबी हीची किडनी मॅच झाल्यामुळे अखेर ही प्रक्रिया पार पाडण्यात आली जिम आणि मायलन यांना त्यांच्या संसाराच्या कालावधीत झालेली मुलगी लग्नानंतर आई होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच ही घटना घडली आहे.

मायलनला आपल्या नातवाचे तोंड पाहायचे होते म्हणून डेबीने हा निर्णय घेऊन किडणी दान प्रक्रिया वेगाने पार पडली अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील या किडनी सिस्टरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.