पुणेः काल माध्यमांमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणाची बातमीने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत मुलाचे अपहरण झाले नसून तो त्याच्या दोन मित्रांसोबत कात्रज येथील कार्यालयातून लोहगाव विमानतळावर गेल्याचे सांगितले. यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली.
माजी मंत्र्यांचा मुलगा सुखरुप असल्याचे समजल्यानंतर कथित अपहरण नाट्यावर पडदा पडला. रात्री उशीरा खासगी विमान लोहगाव विमानतळा उतरवण्यात आले. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कोण आहे हा हाफकिन माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज शेठ हा नाराज झाला आणि थेट प्रायव्हेट चार्टर प्लेन घेऊन बॅंकॉकला फिरायला चालला होता. इकडे माननीय माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नई येथे उतरविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
बरं काही दिवसांपूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने माननीय तानाजी सावंत साहेब अशाच प्रकारे नागपूरच्या अधिवेशनातून नाराज होऊन बॅगा भरुन निघून गेले होते बरं का, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अंकाउंटवरून एक फोटो शेअर करत वरील पोस्ट केली आहे.
कोण आहे हा हाफकिन
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज शेठ हा नाराज झाला आणि थेट प्रायव्हेट चार्टर प्लेन घेऊन बॅंकॉक ला फिरायला चालला होता.
इकडे माननीय माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नई येथे उतरविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
बरं… pic.twitter.com/MN3Tip7rTL— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 10, 2025
नेमकं काय घडलं होतं?
काल सायंकाळच्या सुमारास टिव्ही चॅनेलवर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी आली. या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. माजी मंत्र्यांचा मुलगा ऋषिकेश सावंत त्याच्याबरोबर असलेले दोन मित्र काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील कार्यालयातून लोहगाव विमानतळावर गेले.
तिथे त्यांनी खाजगी विमानातून विमानातून बँकाँककडे उड्डाण केले. त्यानंतर मुलाने विमानासह मित्रांची माहिती कुटुंबीयांना मेसेजद्वारे दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ पाऊल उचलत वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवली. पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक कक्षाशी संपर्क साधला.
बँकाकच्या दिशेने जाणारे विमान पुणे पोलिसांनी विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरविण्याच्या सूचना कॅप्टनला देण्यात आल्या. त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. विमान विमान विशाखापट्टम येथे उतरवण्यात आले. अखेर या संपूर्ण घटनाक्रमानंतर माजी मंत्र्यांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावर पडदा पडला.