पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणी तानाजी मालुसरे यांचा मुखवटा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा घातलेली छायाचित्रे पॉलिटीकल किडा व्टिटर हॅडेलवर प्रसिध्द झाली आहे. या व्टिटर हॅंडेलविरुध्द राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेश हांडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
या छायाचित्र आणि व्हिडिओमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालूसरे यांची बदनामी केली आहे. हा व्हिडिओ प्रकाशित करण्याचा हेतू दिल्ली विधानसभा 2020 निवडणूक असल्याने व्टिटर अकाऊंटविरुध्द तक्रार देण्यात आल्याचे म्हटले आहे.
अशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने तानाजी चित्रपटातील काही भाग घेऊन दाखविण्यात आलेल्या मुखवट्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान, हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने पोलिसांनी तातडीने या प्रकरणी कारवाई करून संबधितांना अटक करावी, अशी मागणी हांडे यांनी केली आहे.
यावेळी राकेश कामठे, स्वप्निल थोरवे, अविनाश भांड, मंगेश जाधव, ओंकार कार्लो आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.