मुंबई – कबीर सिंग या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’ने फॅन्सच्या मनात आपले एक वेगळे घर निर्माण केले आहे. कबीर सिंग सिनेमात कियाराने एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होती.
यात तिचे कपडे अतिशय साधेसुधे होते. मात्र, ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. कियारा आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो सतत इंटरनेटवर शेअर करत असते. कियाराची ग्लॅमरस शैली चाहत्यांना देखील खूप आवडते. त्यामुळे ते तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. कियाराने नुकतेच एका प्रसिद्ध मॅगझिनच्या आवृत्तीसाठी टॉपलेस फोटोशूट केले असून यामध्ये ती चांगलीच हॉट दिसत आहे.
तिचे चित्रपट क्षेत्रात करिअरला सुरुवात झाली असून तिला पुढे न साकारलेली एकतरी भूमिका साकारायची मनस्वी इच्छा आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीची देखील अशीच इच्छा आहे. कियाराने तिच्या या लाडक्या भूमिकेबाबत चाहत्यांशी शेअर केलं आहे.
लाइव्ह सेशन दरम्यान तिच्या एका फॅनने भविष्यात एखाद्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला कुणाची भूमिका करायला आवडेल, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना अभिनेत्री कियारा म्हणाली, “मला मधूबालाची भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. “, असं म्हणाली. तसंच हे तिचं स्वप्न असल्याचं देखील तिने यावेळी सांगितलं.
नुकतंच कियाराचा हा टॉपलेस अंदाज पाहून केवळ तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सदेखील घायाळ झाले आहेत. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत कियारा जबरदस्त पोझेस देताना दिसत आहे. फोटोमध्ये ती वाळूवर झोपलेली आहे आणि तिने या फोटोशूटसाठी सटल मेकअप देखील केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कियाराच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट देखील कियाराच्या या जबरदस्त फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकलेली नाही. सध्या तिचा हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.