कियारा आडवाणीचा “इंदू की जवानी’ 11 डिसेंबरला रिलीज

कियारा आडवाणीचा “इंदू की जवानी’ हा कॉमेडी सिनेमा याच वर्षी 11 डिसेंबरला रिलीज होणार आहे. यामध्ये कियारा आडवाणीबरोबर आदित्य सील लीड रोलमध्ये असणार आहेत. यापूर्वी कियारा आडवाणीने याच सिनेमातील “हसीना पागल दीवानी’या गाण्याचा टीजर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


अबीर सेनगुप्ताचे डायरेक्‍शन आणि टी-सिरीजचे प्रॉडक्‍शन असलेल्या या सिनेमात विवाह आणि कौटुंबिक वातावरणातील धम्माल बघायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. आधुनिक काळातील लव्ह स्टोरी आणि ऑनलाईन मॅच मेकिंग साईटच्या माध्यमातून डेटिंग स्टाईलची धम्माल यात बघायला मिळणार आहे. हिरोईन केंद्रित सिनेमा असल्यामुळे यात कियाराच्या अभिनयाला अधिक वाव असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


इंदू ही गाझियाबादमधील एक आधुनिक मुलगी वेगवेगळ्या डेटिंग ऍप्सच्या माध्यमातून स्वतःसाठी जोडीदार शोधत असते. त्यातून तिला येणारे वेगवेगळे अनुभव प्रेक्षकांना निश्‍चितच हसवून सोडतील, अशी अपेक्षा आहे. या वर्षभरातला कियाराचा हा अखेरचा सिनेमा असणार आहे. आता ती वरुण धवनच्या बरोबरच्या “जुग जुग जिओ’च्या शुटिंगमध्ये लक्ष केंद्रित करायला रिकामी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.