कबीर सिंग या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे. कबीर सिंग सिनेमात कियाराने एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. यात तिचे कपडे अतिशय साधेसुधे होते. मात्र, ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. कियाराचे स्टायलिश फोटो इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात.
त्यातच नुकतेच तिने एका प्रसिद्ध मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्यातील आवृत्तीसाठीच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती चांगलीच ग्लॅमरस दिसत असून यात तिने ब्लॅक रंगाचा आऊटफिट घातला असून ती अतिशय बोल्ड दिसत आहे. तिने सेलिब्रेटी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला प्लेन प्लेटेड स्कर्ट आणि क्रॉप टॉप कॅरी केला होता. यात क्रॉप टॉपमध्ये पुढच्या बाजूला कटआऊट डिटेंलिंग करण्यात आली होती. हा आऊटफिट साधारण लेहंग्यासारखा दिसत होता.
कियाराचा हा लूक मनीष मल्होत्राने सुंदर हेवी नेकलेसने ऍक्सेसराईज केला होता. हा नेकलेस त्यांच्या लवकरच लॉंच होणाऱ्या ज्वेलरी कलेक्शनपैकी एक आहे. या दरम्यान कियाराने न्यूड लिपस्टिकने सबटल मेकअप ठेवला होता. हेअरस्टाईलबाबत बोलायचे झाल्यास तिने आपल्या केसांची मध्ये पार्टिंग करून सॉफ्ट कर्ल्स करताना ओपन ठेवले होते. त्यामुळे या कव्हरपेजच्या फोटोची चर्चा सगळीकडे होत असून कबीर सिंग मधल्या साध्या कियाराचे अनेक स्टायलिश अवतार पुढे आहे. तिचे चाहतेही तिच्या स्टायलिश लूकला पसंती देत आहेत.