Kiara Advani Troll Viral Video | कियारा अडवाणीचे लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नाव घेतले जाते. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये कियाराला दक्षिणेकडील राज्यांची नावं विचारण्यात आली आहेत मात्र तिला ती सांगता आली नाही.
अभिनेता राणा दग्गुबाती याच्या ‘नंबर 1 यारी’ या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शोमधील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये राम चरण आणि कियारा आले होते. 2023 मध्ये प्रसारित झालेल्या या एपिसोडमधील काही क्षण चर्चेत आली आहे. राणा आणि राम यांनी कियाराला दक्षिण भारतीय राज्यांची नावे विचारली, पण कियाराला उत्तर न सांगता आल्याने तिच्यावर टीका केली जात आहे. Kiara Advani Troll Viral Video |
व्हिडिओमध्ये राणा तिला दक्षिणेकडील राज्यांची नावं विचारतो. त्यावर कियाराच्या तोंडावरून स्पष्ट दिसते की राज्यांची नावं आठवत नाहीत. कियाराने तेलंगणापासून सुरुवात केली. त्यानंतर तिने आंध्र प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटकचं नाव घेतलं. राणाला तिला तमिळनाडूची आठवण करुन देण्यासाठी मदत केली. Kiara Advani Troll Viral Video |
त्यानंतर राणाने तमिळ भाषा कुठून आली हे विचारलं. त्यानंतर ती केरळचा उल्लेख करायला विसरली. राणानं पुन्हा तिला मदत करण्यासाठी म्हटलं की मल्याळम ही भाषा कुठून आली? कियाराला या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हते. रामनं सगळ्यात शेवटी केरळ उत्तर दिले. कियारा यावर मी हेच उत्तर देणार होते, असे म्हणते. सध्या कियाराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. Kiara Advani Troll Viral Video |
यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘मला खरंच माहित नाही की हे मुलं भारतातील मोठ्या आणि महागड्या शाळांमध्ये नेमकं काय शिकतात. म्हणजे सरकारी शाळेतील बॅकबेंचर देखील हे सगळं सांगू शकतात.’ सध्या कियाराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
हेही वाचा:
“खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर” ; बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा