नवी दिल्ली – किया इंडिया कंपनीने स्थापनेपासून 13 लाख वाहन निर्मितीचा टप्पा ओलांडला आहे. यातील 10.5 लाख वाहने देशातील बाजारपेठेसाठी तर 2.5 लाख वाहने निर्यातीसाठी तयार करण्यात आली. लवकरच कंपनी नवी एसयुव्ही सादर करणार असून या वाहनाचे नाव सायरॉस असे ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत कंपनीने भारतात पाच वाहने उपलब्ध केली आहेत. त्यामध्ये सेल्टॉस, कार्निवल, सॉनेेट, ईव्ही सहा या वाहनांचा समावेश आहे. कंपनीची उत्पादन क्षमता वर्षाला तीन लाख युनिट आहे. कंपनीने म्हटले आहे की, सायरॉस भारतीय ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन विकसित करण्यात आली आहे, या वाहनाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.