दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर भलेही चित्रपटसृष्टीत झळकली नसली तरी ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या खुशी ही वडील बोनी कपूर यांच्यासोबत बाली येथील एका लग्नसोहळ्यासाठी गेली आहे. या सोहळ्यानिमित्त आयोजित एका पूल पार्टीतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
या फोटोंमध्ये खुशी ही काका संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर हिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. या पूल पार्टीत खुशीने पिवळ्या रंगाची फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. तर शनाया पांढ-या रंगाच्य ब्रालेट आणि डेनिम शॉर्टसमध्ये दिसते. या फोटोत दोन्ही बहिणींच्या चेहरावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.
दरम्यान, श्रीदेवी यांचा मित्र असलेल्या राखी पंजाबी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त विविध फंक्शन आयोजित करण्यात आले आहेत. या फंक्शनमध्ये सिंगर नेहा कक्कडपासून अभिनेखी कतरिना कैफही सहभागी झाली होती.