खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवरी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांच जागीच मृत्य झाला. हा अपघात खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर घडला आहे.
मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली.
त्यापाठोपाठ आणखी दोन वाहने येऊन धडकली. या अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.