Akshay Kumar : खिलाडी कुमार अर्थात सर्वांचा लाडका अक्षय कुमार त्याच्या ‘भूत बंगला’ चित्रपटातील वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता. अक्षय कुमारच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. या चित्रपटाच्या यशानंतर आता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता चाहत्यांना लागली असून, अशातच त्याच्या हॅालिवूडच्या तोडीस तोड निर्मिती असलेल्या एका चित्रपटाचे नाव समोर आले आहे. तसेच याबाबत महत्वाची अपडेट देखील आली आहे. हा एक स्पाय-ॲक्शन चित्रपट असणार आहे. प्राथिमक माहितीनुसार, या चित्रपटाचे नाव ‘समूक’ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एचटी सिटीच्या वृत्तानुसार, या प्रोजेक्टचे नाव ‘समूक’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा करत आहेत. अक्षय कुमार, विपुल अमृतलाल शाह आणि आशिम शाह यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एलियन्सच्या भयानक जगाची एक झलक दाखवेल. विशेष म्हणजे, हॉलिवूडचे स्टंट कोऑर्डिनेटर ल्यूक टंबर हे देखील ‘समूक’मध्ये सामील झाले आहेत. त्यांनी ‘मिशन: इम्पॉसिबल’, ‘वेनम’ आणि ‘प्रिडेटर’ यांसारख्या स्पाय-ॲक्श चित्रपटांवर काम केले आहे. अक्षय कुमारचा वेलकम टू द जंगल लवकरच भेटीला अक्षय कुमार लवकरच “वेलकम टू द जंगल” या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असून तब्बल ३५ कलाकारांच्या भूमिका आहेत. यात प्रामुख्याने दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेही वाचा : Actress Mrunal Thakur : “कॅामेडी चित्रपटात काम करायचे झाल्यास…”; मृणाल ठाकूरचं वक्तव्य चर्चेत!