खेडची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल

राजगुरूनगर -खेड तालुक्‍यात शनिवारी (दि. 4) 28 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्‍याची संख्या 183वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. खेड तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांत करोना बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. राजगुरूनगर, चाकण शहरातती झपाट्याने वाढत आहे. 

राजगुरूनगर शहरात शनिवारी सर्वाधिक 7 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, शनिवारी राजगुरुनगर 7, पिंपरी बुद्रुक 6, कन्हरसेर 3, काळूस 3, आळंदी 2, दावडी 2, सावरदरी 1, चाकण 1, चऱ्होली बुद्रुक 1, मरकळ 1 व्यक्‍ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

तालुक्‍यात दररोजची संख्या वाढू लागल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिक स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात 5 व्यक्‍तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 64 व्यक्‍ती करोनावर मात करून घरी परतले आहे. 125 जणांवर उपचार सुरू आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.