कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावरील वादग्रस्त खेडशिवापूर टोलनाका हटविण्यासाठी आज जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तब्बल दीड हजार पोलीस महामार्गावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवारपुर टोलनाका हटवण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलन मोठ्या प्रमानात पोलिस बंदोबस टोल नाक्यावर छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान,खेडशिवापूर (ता. हवेली) येथील वादग्रस्त टोलनाका आणि शिंदेवाडी ते सारोळापर्यंत महामार्गावर पोलीस तैनात आले आहे.
महामार्गावर कोणतीही गडबड होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्तात दोन अपर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 54 सहायक निरीक्षक, 780 पोलीस कर्मचारी, चार एसआरपीएफच्या कंपन्या, शिघ्र कृती दलाची चार पथके, अन्य पथक असा एकूण दीड हजार पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसेच अग्निशमन दल, आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
धार्मिकस्थळांवरही बंदोबस्त
खेड शिवापूर टोलनाका आंदोलनवेळी गडबड होण्याची शक्यता असलेला टोलनाका परिसर, शिवापूर दर्गा, कापूरहोळ, कोंढणपूरफाटा, चेलाडीफाटा यासह धर्मिक स्थळ परिसरातील काही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.