राजगुरूनगर (प्रतिनिधी) :- खेड तालुक्यात २४ तासात नव्याने ११६ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंतचा हा पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांकी आकडा असून तालुक्यात पुन्हा करोना विषाणू संसर्ग भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत २९३७ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी २२९३ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. ५७२ व्यक्तीवर उपचार सुरु आहेत .
खेड तालुक्यात मागील २४ तासात आतापर्यंतचे रेकॉर्ड तोडले असून आज तब्बल ११६ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात आज सर्वाधिक ७३ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. आळंदी नगर परिषद हद्दीत आज २० व्यक्ती बाधित सापडल्याने शहरातील हा मोठा उच्चांक आहे.
चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत करोनाचा विळखा वाढत असून प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील बाधित व्यक्तींची संख्या आतापर्यंत १६६७ झाली असून १३०७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. ग्रामीण भागात ४० व्यक्ती आतापर्यंत दगावल्या असून ३२० व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
तालुक्याची करोना बाधित व्यक्ती संख्या २९३७ झाली आहे. पैकी २२९३ व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. ५७२ व्यक्तींवर करोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात ७२ व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती पस सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यात मागील २४ तासात राजगुरूनगर १०, चाकण १३, आळंदी २० या तीन नगर परिषदांमिळून ४३ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील खराबवाडी (१४), मेदनकरवाडी (१०) मरकळ (५), चिंबळी (५), कनेरसर (५), वाकी बुद्रुक (४), धानोरे (४), भोसे (४), आंबेठाण (३), केळगाव (२), शेलपिंपळ्गाव (१), काळूस (१), कुरुळी (२), खालुंब्रे (२), निघोजे (१), पिंपरी बुद्रुक (२), ढोरे भांबुरवाडी (१), तुकई भांबुरवाडी (१), मोहकल (१), चास (१), मिरजेवाडी (१), रेटवडी (१), कडूस (१) नाणेकरवाडी (१), या २५ गावात एकूण ७३ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.