राजगुरूनगर (प्रतिनिधी): म्हाळुंगे ता खेड येथील म्हाडाच्या इमारतीमधील कोव्हीड केअर सेंटर आज पासून सुरु झाले. त्याची प्रत्यक्षात सुरुवात तहसीलदार सुचित्रा आमले, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, महादेव कनकवले, दीपक मुंढे, सुरेश कानडे, यांच्या उपस्थित झाली.
आज पहिल्याच दिवशी १७ जणांचे स्वब तपासण्यात आले. त्यातील तीन जणांना क्वारंटाईन केले आहे. दरम्यान येथे येणाऱ्या रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी येथे सेवा करणाऱ्या डॉ सुरेश गोरे यांनी केळी, आंबे, लिंबू, साखर, सफरचंद, आदी फळांचे मोफत वाटप केले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फळे व आवश्यक आहारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.