Khawaja Asif Statement: भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या इशाऱ्याने पाकिस्तान हादरले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उघड धमकी दिली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणतेही गैरकृत्य करण्याचे धाडस केल्यास, त्याला इतिहासजमा करू, असे ते म्हणाले. एवढंच नाही तर त्यांनी भारताचा भूगोल बदलण्याची धमकीही दिली आहे. ख्वाजा आसिफ यांनी एका खासगी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. संभाषणादरम्यान, त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा संदर्भ दिला. आसिफ यांनी, “त्यावेळी पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर दिले होते आणि त्यामुळे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता” असा दावा केला. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे विधान Khawaja Asif Statement: भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका विधानानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. जनरल द्विवेदी म्हणाले होते की, पाकिस्तानने ठरवले पाहिजे की त्याला भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा. या विधानावर प्रतिक्रिया देताना ख्वाजा आसिफ यांनी थेट भारताला धमकी दिली आहे. त्यांनी याविषयी बोलताना, “भारतीय लष्करप्रमुख आपला गमावलेला सन्मान परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत”असे म्हणाले. मुलाखतीदरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) महासचिव दत्तात्रेय होसाबळे यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. होसाबळे यांनी म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात संवाद होण्याची शक्यता खुली आहे. Khawaja Asif Statement: आसिफ यांनी दावा केला की, भारतातील लष्करी आणि नागरी समाजाची मते भिन्न आहेत. त्यासोबतच भारतात सरकारविरोधात आवाज उठवला जात आहे” असेही त्यांनी यावेळी म्हटले. भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी, “बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या शेजारी देशांशी भारताचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ” असे म्हटले. आसिफ यांनी आरोप केला की, “परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर भारताला अडचणींचा सामना करावा लागत आहे.” त्यांनी भारत-इस्रायल संबंधांवरही भाष्य केले. आसिफ म्हणाले की, या प्रदेशात भारताव्यतिरिक्त इतर कोणताही देश अधिक शक्तिशाली झालेला इस्रायलला पाहायचा नाही. सिंधू पाणी करारावर ख्वाजा आसिफ यांचा दावा Khawaja Asif Statement: सिंधू पाणी करारावर बोलताना, ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, “हा करार गेल्या ६६ वर्षांपासून अंमलात आहे आणि तो एकतर्फी निलंबित केला जाऊ शकत नाही. त्यांनी नमूद केले की, स्थायी लवाद न्यायालयाने अलीकडेच या प्रकरणात पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिला आहे. आसिफ यांच्या मते, या करारामध्ये मजबूत विवाद निवारण यंत्रणा आहेत.