#कोरोना- गावकऱ्य़ांनी गावाच्या वेशीवर खडक लावले आणि….

खटाव- खटाव तालुक्यातील ओंध गावातील सीमा खडक लावून बंद करण्यात आल्या आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांनी गावाकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर मोठे खडक लावले आहे.


या सीमा बंद केल्यामुळे गावात कोणालाच प्रवेश घेण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे गावात किंवा गावाबाहेर मोकाट फिरणाऱ्या सगळ्या नागरिकांना चोप  बसला आहे. सध्या कोरोनाची लागण वाढत आहे त्यात राज्यात सगळीकडे संचारबंदी केली आहे. याच संचारबंदीचं उल्लंघन रोखण्यासाठी शहरातच नाही तर गावपातळीवरही जोमात प्रयत्न सुरु आहे. औंध गाव हे त्याचंच एक उदाहरण आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंंदिवस वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात जास्त खबरदारी घेतल्या जात आहे. अनेक सुचना दिल्या आहेत. त्या सुचनांचं गावकरी पालन करताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.