खर्डा ग्रामस्थांचे खड्ड्यात आंदोलन

शिर्डी – हैदराबाद महामार्ग खड्डेमय  

खर्डा  –  शहरातून जाणाऱ्या शिर्डी – हैदराबाद महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज खर्डा ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यात बसुन आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी खर्डा सरपंच संजय गोपाळघरे, भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, उपसरपंच संजय सुर्वे, माजी सरपंच शिवकुमार गूळवे, भागवत सुरवसे, संतोष थोरात, एजाज झिकारे, विजय श्रीसगर, प्रशांत कांबळे, बाबासाहेब चौदार, बळी दराडे, ग्रामसदस्य बापू ढगे, विकास शिंदे, गणेश डाडर, वैजिनाथ पाटील, विजय साळुंखे, सनी पवार, हिंदू घीसदी समाज खर्डा शहर अध्यक्ष आकाश पवार उपस्थित आहे.

अनेक दिवसांपासून शिर्डी – हैदराबाद राज्य महामार्गावर अनेक खडे पडून अपघात होत आहे. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊनही हे काम होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन करावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.