खर्डा स्कूलचे इंन्स्पायर विज्ञान प्रदर्शनात यश

खर्डा – येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूलने इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन 2018-2019 मध्ये यश मिळविले आहे. यंदाचे इन्स्पायर अवार्ड जिल्हा विज्ञान प्रदर्शन नेवासाफाटा येथे भरले होते. यासाठी खर्डा इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी गणेश पवार (इ. 6 वी) या या विद्यार्थ्याने प्रदूषणमुक्त फटाके हे मॉडेल बनवले होते, त्याच्या मॉडेलची निवड राज्य प्रदर्शनासाठी झाली.

गांधी विचार फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने 2018-19 साठी घेतलेल्या गांधी विचार परीक्षेमध्ये दिपाली गोलेकर ही रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहभागी विद्यार्थी, गणित-विज्ञान मार्गदर्शक शिक्षक व विभागप्रमुख कैलास बिरंगळ, प्राचार्य अशोक रुद्रके, उपप्राचार्य लहाणू जाधव, पर्यवेक्षक रमेश पाटील तसेच नितीन गोलेकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, व किशोरशेठ कांकरीया स्कूल कमिटी उपाध्यक्ष व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)