Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. लैंगिक शोषण झाल्याची एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हे खळबळ उडवून देणारे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडवून दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना खरातची जवळीक अडचणीत आणणारी ठरली. Ashok Kharat Case राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर चाकणकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन देखील पायउतार व्हावे लागले. या प्रकरणाची सध्या एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून, दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत. Ashok Kharat Case : खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर; शिंदे, पाटील, शेलार, चाकणकरांचा प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख आता भोंदूबाबा अशोक खरात याचे महाराष्ट्रातील राजकारण्यांशी किती घनिष्ट संबंध होते, याचा पुरावाच समोर आला आहे. अशोक खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो समोर आला आहे. या लग्नपत्रिकेवर अनेक राजकारण्यांची नावे असल्याची माहिती समोर आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून नमूद करण्यात आली होती. यानंतर विविध चर्चांना उधाण आले असून, तर्क वितर्क लावले जात आहेत. Ashok Kharat Case महत्वाची बाब म्हणजे, अशोक खरात याच्या मुलीच्या नाशिकमधील लग्नाला महाराष्ट्रातील अनेक राजकारणी हजर होते, अशीही माहिती समोर आली आहे. सध्या एसआयटीकडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे महाराष्ट्रातील 40 ते 45 राजकीय नेत्यांशी संबंध होते. Ashok Kharat Case धक्कादायक गोष्ट म्हणजे हे राजकीय नेते नियमितपणे अशोक खरात याच्या संपर्कात असायचे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला आणि वेळेला भरायचा याचा मुहूर्तही अशोक खरात या राजकीय नेत्यांना काढून द्यायचा. कोणाला काही समजू नये म्हणून अशोक खरातने मोबाईमध्ये या राजकारण्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती. दोन दिवसांपूर्वी एसआयटीने खरातच्या मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यास सुरूवात केली असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. खरातच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा रिकव्हर झाल्यानंतर तांत्रिक पडताळणी केल्यावर नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या माहितीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. हेही वाचा : Mohammad Safa: इराणवर अणुबॉम्ब टाकला जाणार? ; UN च्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप ; १२ वर्षांची कारकीर्द लावली पणाला