लोणावळा-पुणे लोकल सजली

खंडेनवमी : लोकल ग्रुपकडून मोटारमनचा सन्मान

कार्ला – लोणावळा-पुणे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी संघटनेच्या वतीने लोणावळा-पुणे लोकल (रेल्वेगाडीला) सजविण्यात आली होती. तसेच मोटारमनचा सत्कार देखील करण्यात आला.

लोणावळा-पुणे लोकलने मावळ तालुक्‍यातील अनेक कामगार, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी दररोज नोकरी निमित्ताने व शिक्षणानिमित प्रवास करत असतात. आज विजयादशमी (दसरा) सुट्‌टी असल्याने खंडेनवमी निमित्त सकाळी 8.20 लोणावळ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या ग्रुपच्या वतिने दररोज बसत असलेल्या लोकलचे व डब्याचे पूजन करुन फुले, फुगे, हार, फुलांची तोरणबांधत रेल्वे डबे सजविण्यात आले होते. तसेच लोकल चालवणारे मोटार मनचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान देखील केला गेला.

तसेच लोकलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अल्पोपहाराचे वाटप देखील लोकल ग्रुपच्या वतीने करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन लोणावळा पुणे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लोकल सर्व डब्यातील ग्रुप मेंबर्सच्या वतीने करण्यात आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.