अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथे युवा नेते अमोल मेथा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 7) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 230 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मा.बळीराम चव्हाण, हनुमंत चव्हाण, मेजर संदीप थोरात, बहुजन क्रांती मोर्चाचे नेते पै.रिकेश चव्हाण, विक्रम मेथा, प्रितम मेथा यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
या प्रसंगी जयभवानी नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते, यशराज सेनेचे कार्यकर्ते,बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व खंडाळी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.