खंडागळे यांचा शिवसेना तालुका प्रमुखपदाचा राजीनामा

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन सोडले पद

नारायणगाव – शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे माउली खंडागळे यांनी जुन्नर तालुका प्रमुख पदाचा जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिला आहे.

शिरूर लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना जुन्नर तालुक्‍यातून मताधिक्‍य न मिळाता राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना 41 हजार 551 इतके मताधिक्‍य मिळाल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख या नात्याने जवाबदारी स्वीकारत खंडागळे यांनी राजीनामा दिला आहे. जुन्नर तालुक्‍यात आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेचे आहेत.

जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके या शिवसेनेच्या आहेत. शिवसेनेच्या ताब्यात पंचायत समिती असून सभापती शिवसेनेच्या ललिता चव्हाण आहेत. जुन्नर नगरपरिषदेचे लोकनियुक्त्‌त नगराध्यक्ष शिवसेनेचे शाम पांडे आहेत. तालुक्‍यात आशा बुचके, गुलाब पारखे, देवराम लांडे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अशी विविध सत्तास्थाने शिवसेनेकडे असूनही तालुक्‍यातून आढळराव यांना मताधिक्‍य मिळाले नसल्याने पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून माउली खंडागळे यांनी राजीनामा दिल्याचे “प्रभात’शी बोलताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)