खडकी बोर्ड करणार ऑक्‍सिजन रिझर्व्ह बॅंकेची निर्मिती

पुणे  – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ऑक्‍सिजन रिझर्व्ह बॅंक (ओआरबी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यांसह देहूरोड आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासही या ऑक्‍सिजन बॅंकेच्या माध्यमातून ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट रुग्णालायात सध्या 70 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था आहे. आणखी गरज पडल्यास व्यवस्था असावी, यादृष्टीने बोर्डाने 30 ते 40 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्‍सिजन बॅंकेत हे सिलिंडर रिझर्व्ह करून ठेवण्यात येतील. बोर्डांच्या रुग्णालयांत रात्री-अपरात्री जरी ऑक्‍सिजनची गरज भासली,तरीही तात्काळ ऑक्‍सिजन सिलेंडर या बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह म्हणाले, “ड्युरा ऑक्‍सिजन सिलिंडरदेखील घेण्याच्या विचारात आहोत. दहा जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडरच्या तुलनेत एक ड्युरा ऑक्‍सिजन सिलिंडर उपयोगी पडू शकतो. त्यामध्ये लिक्विड ऑक्‍सिजनची व्यवस्था असते. बोर्डाला रोटरी क्‍लबतर्फे तीन ऑक्‍सिजन कन्सस्ट्रेट मशिन मिळाल्या आहेत. आणखी दहा जम्बो सिलिंडरही रोटरी क्‍लबने बोर्डाला दिले आहेत. आगामी काळात ऑक्‍सिजन प्लॅन्ट बसविण्याचा बोर्डाचा विचार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असून, संरक्षण मंत्रालयासही याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्याला मान्यतेची प्रतीक्षा आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.