कोल्हापूरात खड्ड्यांच्या वाढदिवस साजरा

सतेज औंधकर 

कोल्हापूर – कोल्हापूरातील रस्त्यावर जिकडं बघाल तिकडे खड्डेच खड्डे आहेत.. खड्ड्यांना त्रासलेल्या वाहनचालकांची आज खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलाय..

ही रस्त्यावरची पांढरी रांगोळी …. फुलांच्या पाकळ्या पाहून तुम्हाला वाटत असेल की इथं कोणाची तरी मिरवणूक येणार आहे … परंतु जरा थांबा … रस्त्यावर बसलेले नागरिक केक कापत आहे तो साजरा करतात खड्ड्यांचा वाढदिवस . खड्यानी त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाचा निषेध केला.

कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्याभोवती रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. वाहनधारकानी या आंदोलनात सहभाग घेतला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत केक कपात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.