खडसे – शरद पवार यांच्यात गुफ्तगू

नवी दिल्ली :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उभय नेत्यांमधील चर्चेचा तपशील काळू शकला नसला तरी एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

उद्धव ठाकरे यांना आज भेटणार?
मुंबईमध्ये उद्या एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्वाची बाब म्हणजे खडसे भाजपच्या नेत्यांची भेट न घेताच मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश असेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज 6 जनपथ येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सर्वांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मागील अनेक दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज आहे. आधी त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. त्यांनतर त्यांच्याऐवजी रोहिणी खडसे यांना तिकीट दिली. एवढंच नव्हे तर, रोहिणी खडसे यांच्या पराभव मागे पक्षातील नेत्यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता.

खडसे म्हणाले, शरद पवारांशी भेटीमध्ये मतदारसंघातील सिंचन योजनांवर चर्चा केली. या योजनांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांनी मतदारसंघातील पराभवाबाबत विचारले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच पवार यांच्याशी आपले जुने संबंध आहेत. यामुळे त्यांना कधीही भेटायला येऊ शकतो, असे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पवार यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात काहीतरी वेगळे होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.