अकोला – कीर्तनकार महाराजांचे अपहरण करून साडेसात लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पृथ्वीराज उर्फ पप्पू ठाकूर, वेदांत साबळे आणि हृषिकेश पातोंड अशी अटक केलेल्या तिघा संशयीतांची नावे आहेत. खदान पोलिसात यांच्याविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांसाठी कीर्तनकार प्रशांत ढेंगळे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर त्यांचे बंधू यांच्याकडे संशयीत आरोपींनी साडेसात लाखांची मागणी केली. त्यापैकी दीड लाख रुपये अपहरणकर्त्यांना देण्यात आले. याप्रकरणी ढेंगळे यांचे बंधूंनी खदान पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.