खंडाळा घाटात दरड कोसळली; मध्य रेल्वे ठप्प

लोणावळा – मध्य रेल्वेच्या खंडाळा घाट सेक्‍शनमध्ये मंकीहिलजवळ गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक दरड कोसळली. यामुळे मध्य रेल्वेची सेवा सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती.

बुधवारी दुपारी एक्‍स्प्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्या नंतर त्याच दिवशी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या खंडाळा घाट सेक्‍शन मध्ये मंकीहिल जवळ एक दरड कोसळली. मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर किलोमीटर क्रमांक 116/47 जवळ ही घटना घडली. या दरडीमुळे मध्य रेल्वेची सेवा दोन तास विस्कळीत झाली होती.

दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पहाटे सहा वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक व आजूबाजूला पडलेला सर्व राडारोडा बाजूला केला. गेल्या सोमवारीच याच ठिकाणी किलोमीटर क्रमांक 115 जवळ असलेल्या बोगद्याच्या समोर दरड कोसळल्याची घटना घडली होती. तर, 13 जून रोजी किलोमीटर क्रमांक 117/500 येथील बोगद्याजवळ दरड कोसळली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here