खडकवासला भरले; रात्री 10 वाजता 2,568 क्यूसेक पाणी सोडणार

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने आज दमदार हजेरी लावली असून खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आज रात्री 10 वाजता 2,568 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. पाणी सोडल्यानंतर नदी पात्रा लगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. धरण परिसरातही पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे-नाले वाहत असून हे पाणी धरणात जमा होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.