खडकवासला धरणातून सायंकाळी पाणी सोडणार

संग्रहित छायाचित्र ...

पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सांयकाळी मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातून पाणी न सोडताही नदीतून सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणत पाणी वाहत आहे. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात शहरात सर्वाधिक पाऊस सहकारनगर धनकवडी भागात तब्बल 150 मिमी पाऊस झाला आहे. तर शिवाजीनगर भागात 131 मिमी पाऊस झाला असून कोथरूड मध्ये 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी रेन गेज (पर्जन्य मापक) बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेतून ही माहिती समोर आली आहे.

शहराच्या इतर भागात झालेला पाऊस पुढील प्रमाणे (पाऊस मिमीमध्ये)

कर्वेनगर – 63.50
घोले रस्ता – 131.50
कोथरूड -120.50
ढोले पाटील रस्ता – 6.00
येरवडा- संगमवाडी – 72.00
नगर रस्ता, वडगावशेरी -54.50
भवानी पेठ – 58.00
कसबा- विश्रामबागवाडा -69.00
टिळक रस्ता – 38.00
महापालिका भवन 49.50
हडपसर- मुंढवा 16.50
कात्रज -65.50

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)