मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार यशची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. KGF आणि त्याच्या दुसऱ्या भागानंतर यशने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. आजकाल KGF स्टार यश त्याची जोडीदार राधिका पंडितसोबत इटलीच्या ट्रीपवर आहे. यादरम्यान यशने त्याच्या चाहत्यांसोबत काही क्षण घालवले, ज्याचा जबरदस्त फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि एक मोठी गोष्ट सांगितली.
रॉकी भाई म्हणजेच यशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यशचा हा फोटो त्याच्या इटली ट्रिप दरम्यान काढण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला यशसोबत राधिका पंडित आणि त्याचे चाहते दिसतील. यशने या चाहत्यांसाठी एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. ज्यात यश म्हणतो, “मला सीमेपलीकडेही तुम्हा सर्वांचे प्रेम मिळत आहे. मी ते स्वीकारतो. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून तुम्हाला भेटणे माझ्यासाठी खूप खास आहे. इटली आणि बांगलादेशातील या अप्रतिम चाहत्यांचे खूप खूप आभार.” अशा प्रकारे यशने त्याच्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.
View this post on Instagram
रॉकीची फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. विदेशातही रॉकीला प्रचंड लोक ओळखतात याच समाधान यशने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्याचे दिसून येते. केजीएफच्या दोन्हीही चॅप्टरनंतर आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या चॅप्टरची आतुरता लागली आहे.