“केजीएफ’च्या पुढच्या भागात रविना टंडन

कोलार गोल्डफिल्ड अर्थात “केजीएफ’च्या पुढच्या सिनेमामध्ये रविना टंडन एका महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. “केजीएफ’ दोन भागांमध्ये बनवला जातो आहे आणि त्याचा दुसरा भाग्त लवकरच येणार आहे. या दुसऱ्या भागाचे डायरेक्‍शन प्रशांत नील हेच करणार आहे. “केजीएफ’च्या या दुसऱ्या भागात ऍक्‍टर यश महत्वाच्या रोलमध्ये असणार आहे. “केजीएफ’मध्ये दमदार अभिनयाबरोबरच ऍक्‍शन पण होती. त्यामुळेच निर्मात्यांनी एकाच वेळी पाच भाषांमध्ये ‘केजीएफ’ केला होता आणि शाहरुख खानच्या “झीरो’बरोबरच रिलीजही केला होता.

या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. “केजीएफ’चा पहिला भाग रिलीज होऊन 100 दिवस झाले आणि आता प्रेक्षकांना त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. रविनाने “केजीएफ’चा दुसऱ्या भागापूर्वी कन्नड फिल्म उपेंद्रमध्ये काम केले होते. तिने पूर्वीही कन्नडमध्ये काम केले होते.

“उपेंद्र’हा तिच्या कन्नडमधील पुनरागमनाचा सिनेमा आहे. “केजीएफ 2’मध्ये तिच्याबरोबर संजय दत्तही असणार आहे, असे समजते आहे. हा सिनेमा एप्रिल 2019 मध्ये रिलीज होणार आहे. हिंदी सिनेमात बऱ्याच दिवसांनंतर रविना दिसणार असल्यामुळे तिच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.