मुंबई – कन्नड सुपरस्टार यशचा आगामी “केजीएफ चॅप्टर 2′ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागलेली आहे. आता चित्रपट निर्मात्यांनी चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली होती. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटसह निर्मात्यांनी “अधीरा’चा लुक रिलीज केला होता.
मात्र संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे’. त्यामुळे संजय दत्तला पुढील उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याचा विचार आहे. तसेच संजय दत्तने ट्विट करत कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
अशा परिस्थितीत केजीएफ चॅप्टर 2 चं चित्रीकरण कसं पूर्ण होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र चाहत्यांच्या प्रश्नावर चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौडा यांनी प्रतिक्रिया दिली. प्रेक्षकांनी काळजी करु नये, केजीएफ चॅप्टर 2 ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल असं त्यांनी म्हटलं आहे.