कन्नड सुपरस्टार यशचा आगामी “केजीएफ चॅप्टर 2′ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागलेली आहे. आता चित्रपट निर्मात्यांनी चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटसह निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, आज “अधीरा’चा लुक रिलीज करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या दिवशी संजय दत्तचा वाढदिवस आहे. या घोषणेसह शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ” आज सकाळी 10 वाजता क्रुरताचे अनावरण’ करण्यात आले आहे. “केजीएफ चॅप्टर 1’ला दर्शकांनी दिलेल्या शानदार प्रतिसादानंतर ज्याने केवळ भारताच नव्हे तर संपूर्ण जगभरीाल लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती. निर्मात्यांनी एका वर्षापूर्वी “केजीएफ चॅप्टर 2’चे पहिले पोस्टर लॉन्च केले होते.
ज्यात रहस्यमयी अधीराची ओळख करून देण्यात आली होती. दरम्यान, काही दिवसांपासून अधिराच्या लुकचा स्केच खूप व्हायरल झाला असून प्रशंसकांमधील उत्सुकता वाढली आहे. आता बुधवारी म्हणजे संजय दत्तच्या वाढदिनी त्याचे अनावरण होत असल्याने चाहत्यांसाठी ही खास भेट असणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात “रॉकिंग सुपरस्टार’ यश, संजय दत्त, रवीना टंडन आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे.