बाजारातील प्रमुख ट्रेंड : चढता कल व उतरता कल

जेंव्हा कोणताही भाव हा नवीन उच्चांक नोंदवत वरील बाजूनं मार्गक्रमण करत असतो व त्या नवीन उच्चांकांदरम्यान येणाऱ्या दुय्यम ट्रेंड (करेक्‍शन) मधील नीचांक देखील चढ्या भावातील असतात. अगदी याउलट प्रकार हा उतरत्या ट्रेंडमध्ये आढळतो. यामध्ये भाव हे नवीन नीचांक नोंदवताना दिसतात तर दरम्यानचे दुय्यम ट्रेंड (पुलबॅक) हे देखील आधीच्या उच्चांकापेक्षा कमी भावाचे असतात.

अपट्रेंड व डाऊनट्रेंड मध्ये साधारणपणे तीन अवस्था असतात, संचयन, सहभागिता व वितरण. संचयन म्हणजे जिथं शेअर्स मोठ्या प्रमाणातगोळा केले जातात. सहभागिता म्हणजे पहिल्या गुंतवणूकदारांमागून या प्रवाहात दाखल झालेले, तर वितरण म्हणजे नफेखोरी ज्यावेळेस पहिले गुंतवणूकदार हे मिळालेल्या बातमीचा जोर कमी होऊ लागल्यामुळे आपले शेअर्स विकण्यासाठी इतर नवीन गुंतवणूकदारांच्या / ट्रेडर्सच्या शोधात असतातती अवस्था. उतरत्या ट्रेंडमध्ये ह्याच अवस्था काहीशा उलट क्रमानं असू शकतात. म्हणजे खराब बातमी कळाली असल्यास सर्वप्रथम स्वतःकडं असलेल्या शेअर्सचं वाटप (गळ्यात मारणं), त्यानंतर इतरांची सहभागिता, यात घेणारे, विकणारे व ट्रेडर्स दोन्ही असू शकतात.असो, जर आपण बाजाराचा नेमका रोख समजू शकलो तर त्याच्या आधारे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम कमी राहू शकते.

बाजारात एकूण तीन कल असू शकतात. एक प्रमुख अथवा मूळ कल जो प्रदीर्घ काळासाठी असू शकतो व जो सहसा बदलत नाही (प्रदीर्घ काळासाठीच्या गुंतवणुकीसाठी), एक मध्यम काळासाठी (साधारणपणे 3-5 वर्षं) व एक तात्पुरता म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड, जो कांही महिने ते फारतर एखादवर्ष राहू शकतो. दोन उच्चांक अथवा दोन नीचांकांच्या आधारे आपण ट्रेंडलाईन (कलरेषा) आखू शकतो. अपट्रेंडमध्येअशा कलरेषा-आधारपातळीजवळ खरेदी करून आपल्या उद्दिष्टांनुसार नफेखोरी करून पुन्हा गुंतवणूक करावयाची झाल्यास भाव परत कल रेषेजवळ आल्यास गुंतवणूक करता येऊ शकते. जोपर्यंत कल बदलत नाही तोपर्यंतअसे ट्रेंड हे महत्त्वाचे ठरतात.

निफ्टीसाठी इ.स. 2003 ते 2008 दरम्यान स्थापन झालेला मूळ कल हा चढता असून त्याची सध्याची आधार पातळी ही 5000 च्या दरम्यान येत आहे. 2008 – 2013 दरम्यान स्थिर झालेला कल हा दीर्घ-मध्यम स्वरूपाचा असून हा देखील चढा आहे व सध्या त्याची आधार पातळी 9100 च्या आसपास आहे, तर निफ्टीचा मध्यम काळाचा ट्रेंड (फेब्रुवारी 2016 व ऑक्‍टोबर 2018 दरम्यानचा) हा देखील उर्ध्व बाजूस कललेला असून त्याची सध्याचीआधार पातळी 10950 च्या आसपास संभवते. मात्र 30 ऑक्‍टोबर 2018 व 19 फेब्रुवारी 2019 या दोन नीचांकांदरम्यान जोडल्या गेलेल्या चढत्या शॉर्ट टर्म ट्रेंडचं नुकतेच 23 जुलै रोजी उल्लंघन झालेलं दिसून येतं. तर 3 जून 2019 व 5 जुलै 2019 रोजी नोंदवले गेलेले उच्चांक यांना जोडल्यास शॉर्ट टर्म डाऊन ट्रेंड निर्माण झालेला दिसून येईल. जोपर्यंत हा उतरता कल वरील दिशेनं छेदला जात नाही तोपर्यंत तरी तेजीस पुष्टी देण्याचं धाडस होत नाही, पाहू कलबदल कधी होतोय !

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.