स्वतंत्र प्रांत कार्यालय ठरणार कळीचा मुद्दा!

– विशाल धुमाळ

मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी दौंड आणि पुरंदर असे दोन तालुक्‍याचे प्रांत कार्यालय सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ते कार्यालय पुणे येथे सुरू होणार होते, त्यावेळी विद्यमान आमदार कुल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पुणे येथे होणाऱ्या कार्यालयास स्थगिती मिळवली. त्यावेळी कुलांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता.

यानंतर हे कार्यालय सासवड येथे सुरू झाले, त्यावेळी विधानसभा निवडणुकीत कुल यांनी प्रांत कार्यालय हे आपत्कालीन आमदारांच्या नाकर्तेपणामुळे सासवड येथे गेले असल्याचा आरोप केला होता. मुद्दाम मोठ्या प्रमाणावर मागील विधानसभा निवडणुकीत घातला देखील होता, आमदार कुल यांनी त्यांच्यादरम्यान दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय आणणार असल्याचे सांगितले होते.

मागील निवडणुकीत कुल हे निवडून आले, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार रमेश थोरात यांनी कुल यांनी हे प्रांत कार्यालय सासवड येथे नेले असल्याचा आरोप केला होता तर आमदार कुल यांनी थोरातांनीच हे कार्यालय सासवड येथे नेले असल्याचे सांगितले होते. दौंड-पुरंदर हे प्रांत कार्यालय झाल्यापासून निवडणुकांमध्ये या कार्यालयाचा मुद्दा आरोप-प्रत्यारोपांनी चांगला गाजलेला पाहायला मिळाला. आता दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू करण्याचे राजपत्र सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. हे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार कुल यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कमेंट करण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजणार, हे मात्र यावरून स्पष्ट होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here