डब्लिन –आयर्लंडचा अव्वल फलंदाज केविन ओब्रायन एका स्थानिक टी-20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करत होता. मात्र, त्याने फटकावलेल्या उत्तुंग षटकारामुळे त्याच्याच गाडीची काच फुटली. केवळ 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 82 धावांची आक्रमक खेळी केली; परंतु आपल्याच गाडीचे नुकसान झाल्याने खेळीच्या आनंदापेक्षा काच फुटल्याची निराशाच त्याने व्यक्त केली.
ओब्रायनने फटकावलेला षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला व त्याच्याच गाडीच्या काचेवर आदळला व गाडीची काच फुटली. लेनस्टर लाईटनिंग विरुद्ध नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स या सामन्यात ओब्रायन लाईटनिंग संघाकडून खेळत होता. ओब्रायनच्या खेळीने लाईटनिंग संघाने हा सामना 24 धावांनी जिंकला.